अभिनेता संजय नार्वेकरांकडून राज ठाकरेंचा ‘जाणता राजा’ उल्लेख !

0

मुंबई: मनसेचे आज पहिले अधिवेशन आहे. गोरेगावला हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांनी भाषण केले. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक करत त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला. त्यानंतर नार्वेकर यांनी लागलीच स्पष्टीकरण दिले. राज ठाकरे यांचे नाव राज असल्याने त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला असे स्पष्टीकरण संजय नार्वेकर यांनी दिले.

मनसेच्या संजय नार्वेकर यांनी ठराव मांडले. यात सिने आणि नाटक क्षेत्राशी संबंधित ठराव होते.