Wednesday , December 19 2018
Breaking News

अभिनेत्री चिन्मयीसमोर विकृताने केले हस्तमैथून!

मुंबई । अभिनेता सुमीत राघवनची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोर विकृताने घृणास्पद वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले येथे भरदिवसा घडला आहे. पांढर्‍या रंगाच्या बीएमडब्लू गाडीचालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरुवात केली. विकृताची विकृती ठेचण्यासाठी त्या धावल्याही मात्र तो तेथून पळून गेला. या प्रकरणाची तक्रार चिन्मयी यांचे पती सुमीत राघवन यांनी ट्वीट करत मुंबई पोलिसांकडे केली आहे.

याबाबत सुमीत यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चिन्मयी यांच्यासोबत हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. पार्ले टिळक शाळेसमोर उभी असलेल्या पांढर्‍या रंगाच्या (गाडी क्र. शेवटचे चार आकडे, 1985) बीएमडब्ल्यूमधील राखाडी रंगाचा सफारी घातलेल्या चालकाने हे घृणास्पद वर्तन केल्याचे सुमीत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. माझी पत्नी फक्त एवढाच क्रमांक पाहू शकली आहे. या चालकाचा तत्काळ शोध घेणे गरजेचे असल्याचे आवाहन सुमीत यांनी मुंबई पोलिसांना केले आहे.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडला तेव्हा त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थीनीही उपस्थित होता आणि विकृताने त्यांच्यासमोरही असाच प्रकार केला असावा, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुमीत राघवण यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. अभिनेते सुमीत यांनी या प्रकरणाबाबतची आणि त्यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी इतर माहिती आम्हाला थेट मेसेज करावी, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे. सुमीत यांच्या ट्वीटला अनेकांनी रिप्लाय देत विकृतावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

About admin

हे देखील वाचा

भिवंडीत राजलक्ष्मी कंपाउंडला भीषण आग

ठाणे – मुंबईत कामगार रुग्णालयाला लागलेल्या अग्निकांडाचे सत्र अद्याप सुरूच असतांना आज दुपारी ३.१५ वाजताच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!