अभिमानास्पद: भारतीय वंशाचे श्रीनिवासान अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशपदी !

0

न्यूयॉर्क: भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन यांनी समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची श्रीनिवासन यांची नियुक्ती झाली आहे. चंदीगड या ठिकाणी जन्मलेले श्रीनिवासन आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल महत्त्व असलेल्या फेडरल सर्किट न्यायालयाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत.

या पदावर कार्यरत असणारे ५२ वर्षीय श्रीनिवासन दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून श्रीनिवासन यांनी काम पाहिले आहे.

श्रीनिवासन उच्च श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण असून, स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून उच्च श्रेणीत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. न्यायाधीश जे. हारवी विल्कीन्सन यांचे सहायक म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरूवात करणारे श्रीनिवासन आता अमेरिकेत मुख्य न्यायाधीश बनले आहेत.