अमळनेरला गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

0

पाडळसरे धरणाला तुटपुंजा निधी : आमदारांविरोधातही राष्ट्रवादीचे आंदोलन

अमळनेर – तालुक्यासाठी संजीवनी असलेल्या पाडळसरे धरणाला राज्याच्या अर्थसंकल्पात तुटपुंज्या निधीची तरतूद करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन्ही आमदारांचा निषेध व्यक्त करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान उद्या दि. २ रोजी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या जेलभरो आंदोलनातही राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार आहे.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाडळसरे धरणाला तुटपुंजा निधी देण्यात आला. त्यामुळे अमळनेर तालुक्याच्या जनतेवर अन्याय झाला व निराशा झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी धरणाला निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले होते. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जनआंदोलन समितीला भ्रमणध्वनीद्वारे सांगितले होते की २३०० कोटी रुपये निधी तात्काळ उपलब्ध करून देतो आणि धरणाचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होत. याचा प्रत्यय कालच्या अधिवेशनामध्ये आला. भाजपाच्या मंत्र्यांच्या सर्व घोषणा फोल ठरल्या व धरण पुर्ण होण्याच्या आशा मावळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या शासनाला जनता येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जागा दाखवलया शिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. शासनाचा, स्थानिक दोन्ही निष्क्रिय आमदारांचा व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करून प्रतिकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. तसेच पाडळसरे जनआंदोलनसमितीच्या जेल भरो आंदोलनासाठी सहभागी होणार असल्याचेही राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, शिवाजीराव दास, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक संजय पूनाजी प.स प्रवीण पाटील,निवृत्ती बागुल योजना पाटील,आशाताई चावरीया, अलका पवार, हिम्मत पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, हर्षल पाटील, गौरव पाटील, गुलाब पिंजारी, अबिद मिस्तरी, सुभाष बापू, रणजीत नाना, भैय्यासाहेब पाटील, निलेश देशमुख, अरुण पाटील, इमरान खाटीक, सुनील शिंपी, कर्तारसिंग, राहुल गोत्राळ, नरेंद्र पाटील, संभाजी पाटील, वसीम पठान बाळा शेख, सोनू पाटील, संभाजी पाटील, महेश पाटील, सुनील पाटील, गजेंद्र पाटील, संजय पाटील, श्याम पाटील, सनी गायकवाड़ आदी उपस्थित होते.