अमळनेरात डॉ. सबनीस यांच्या व्याख्यानाचे आयोजन

0

अमळनेर । येथील फिनिक्स सोशल अवेरनेस गृपच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे समाज प्रबोधन व राष्ट्र उभारणी ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन गृपच्या अध्यक्षा अ‍ॅड. ललिता पाटील यांच्याहस्ते होणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहीत्य क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी तसेच युवक बंधु भगिनींनी 26 जुलै गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मराठा मंगल कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन फिनिक्स सोशल अवेरनेस गृप व जिजाऊ बहुद्देशिय संस्था यांच्यावतीने करण्यात आले आहे.