अमळनेर नगरपालिकासफाई कामगारांना किट वाटप

0

अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला उपक्रम

अमळनेर । येथे जागतिक कीर्तीच्या विप्रो कंपनीचे प्रमुख अजीम प्रेमजी यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त पालिकेतील सफाई कामगारांना किट वाटप करण्यात आले. येथील सुनिलभाऊ चौधरी मित्र परिवार व लायन्स, लायनेस क्लब तर्फे आयएमए-लायन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक रफीक शेख, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा प्रा. नयना नावसरीकर, राजाराम चौधरी, खा.शि.मंडळाचे कार्या उपाध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
लायन्स क्लबतर्फे भेटवस्तू स्वरूप पुस्तक देण्यात आले. सुनील माहेश्‍वरी यांनाही सन्मानीत करण्यात आले. शेख यांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रसंशा केली. श्री. सिंघवी यांनीही मनोगत व्यक्त केले. सफाई कामगारांना जे किट देण्यात आले त्यात कॅप, मास्क, रबरी हँड ग्लोज व बूट यांचा समावेश होता. 200 कामगारांना हे किट देण्यात आले. यावेळी समस्त चौधरी परिवार, लायन्स परिवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.