अमळनेर न.पा. उपमुख्याधिकारींवरील हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक !

0

अमळनेर: अमळनेर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर काल रात्री तीन अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान संदीप गायकवाड यांना जखमी अवस्थेत धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी रात्रीतून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. कुणाल शिंपी, राजेश ऊर्फ दादू धोबी, आकाश शिंदे असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.

धुळे रोडवरील साई हॉटेलजवळ नाशिक येथे जाण्याकरिता उभे असताना तिघांनी त्यांच्याकडील मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर चाकू हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर दुचाकी क्रमांक ७५०३ ने फरार झाले.