Tuesday , June 19 2018
Breaking News

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. जोधपूरमध्ये ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक जोधपूरला गेले होते. अमिताभ बच्चन एका चाटर्ड विमानाने मुंबईमध्ये परतले आहेत.

काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय तपासणी केली
काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली होती. प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिली होती. पहाटे 5 वाजता शूटिंग संपवून बिग-बी हॉटेलवर आले आणि प्रकृती ठीक वाटत नसल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले. शिवाय, डॉक्टर प्रकृतीची तपासणी करण्यासाठी येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. पहाटेचे 5 वाजलेत, एका नवीन पहाटेची सुरुवात. काही लोक जगण्यासाठी काम आणि मेहनत करत आहेत. अडचणींचा सामना केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. बराच संघर्ष, निराशा आणि वेदना होतील. तेव्हाच आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील. कधी होतील आणि कधी होणार नाहीत. जेव्हा आपली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तेव्हा आपण अधिक चांगले करण्याची गरज आहे.

हे देखील वाचा

देशात हम करे सो कायदा ही स्थिती!

मुंबई । राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान वाचवा, देश वाचवा’, या सुरू करण्यात आलेल्या अभियानांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!