अमेरिकन नागरिक म्हणतो ‘मला अमेरिकेपेक्षा भारत सुरक्षित वाटते, मला येथेच राहू द्या’ !

0

कोची: सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील एकही असा देश नाही ज्या ठिकाणी कोरोना नसेल. भारतातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. मात्र इतर देशाच्या तुलनेत भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदरही कमी आहे. दरम्यान एका अमेरिकन पर्यटकाची गोष्ट समोर आली आहे. ज्याला स्वत:च्या देशापेक्षा भारतात अधिक सुरक्षितता वाटत आहे. केरळ राज्यातील कोची येथे मागील पाच महिन्यापासून जॉनी पियर्स नावाची अमेरिकन व्यक्ती थांबून आहे. कोरोनामुळे तो येथेच अडकला आहे. मात्र त्याने आता उच्च न्यायालयात धाव घेतली असून पर्यटक व्हिसाला उद्योग व्हिसा(tourist visa to business visa)मध्ये रुपांतरीत करून मिळावे  अशी मागणी केली आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे अराजकता माजली असून तेथील सरकार याबाबत गंभीर नसून मला भारतातील सरकार आवडायला लागली आहे. मला भारतातच थांबायचे आहे अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढील १८० दिवस मला केरळमध्येच राहायचे आहे, या ठिकाणी मला ट्रॅव्हेल कंपनी सुरु करायची आहे. माझ्या परिवाराला देखील मी येथे बोलवून घेणार आहे. मी भारतात समाधानी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.