अमेरिकेत हाहाकार; करोनाच्या बळींची संख्या ८ हजारांवर

0

वॉशीग्टन: करोना विषाणूने अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून शनिवारपर्यंत आठ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवार ते शुक्रवारमधील २४ तासांमध्ये तेथे तब्बल १४८० जणांचा मृत्यू झाला. तर, शनिवारी जवळपास १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या मृतांची संख्या ही आतापर्यंत एका दिवसात एका देशात करोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. दरम्यान, अमेरिकेने मदतकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.
करोना विषाणूंच्या प्रादुर्भावातून अमेरिकेत आतापर्यंत आठ हजार ४५२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख ११ हजार ३५७ जणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेमध्ये करोनाच्या फैलावाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क राज्याला बसला आहे. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये ६३० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.