अरे बापरे… जिल्ह्यात आणखी 292 कोरोनाबाधीत

0

 

जळगाव- जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाने हॅट्रीक साधत 200 चा आकडा पार केला. जिल्ह्यात आणखी नवीन 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 302 झाली आहे. गुरुवारी सर्वाधिक 82 कोरोनाबाधीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 207 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 82 , जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18, अमळनेर 12, पाचोरा 1, भडगाव 1, धरणगाव 4, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 8, पारोळा 14, चाळीसगाव 17, मुक्ताईनगर 31, बोदवड 19 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 2, जामनेर तालुक्यातील 2, चाळीसगाव, पाचोरा, रावेर, पारोळा प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे, अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.