अर्थव्यवस्थेत सरकारने स्थिरता व शिस्त आणली; असोचॅम परिषदेत मोदींचे भाषण

0

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचे आरोप होत आहे. जीडीपीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने देखील मोदी सरकारला लक्ष केले जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी असोचॅमच्या वार्षिक परिषदेत आर्थिकबाबीवर भाषण केले आहे. या सरकारने ५-६ वर्षापूर्वी मोठ्या संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. अर्थव्यवस्थेत स्थिरता आणून या सरकारने शिस्त आणली असल्याचे मोदींनी सांगितले.

दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या उद्योग क्षेत्रातील मागण्यांवर सरकार लक्ष देत असल्याचेही मोदींनी सांगितले. अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मोदींनी असोचॅमच्या परिषदेत सांगितले. असोचॅमही वाणिज्य क्षेत्रातील मोठी संघटना आहे. मोठमोठे उद्योजक यात आहेत.