अर्थसंकल्प: आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न: मोदी

0

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज शुक्रवार ३१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. जागतिक मंदी आणि भारतातील महागाई वाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्याच्या पदरी काय पडते? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचेही मोदींनी सांगितले आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर विरोधकांच्या निशाण्यावर असताना उद्या अर्थमंत्री निर्मला सितारमन अर्थसंकल्प मांडणार आहेत.