अर्थसंकल्प LIVE: प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे उभारणार

0

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा आज पहिलाच अर्थसंकल्प आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन योगायोग आजच शंभर दिवस पूर्ण होत असल्याने याकडे विशेष लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडत आहेत. विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई अर्थसंकल्प मांडत आहेत.

https://www.youtube.com/c/MlsComputerAssembly/live

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे*

महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध, प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे उभारणार

आमदार निधी २ कोटीवरून ३ कोटी

भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार

जलसंपदा विभागासाठी १००३५ कोटींचा निधी देणार

*सामाजिक न्याय खात्याला 9 हजार 668 कोटी रुपयांची तरतूद

  • तरुणांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

*प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे सरकारचे ध्येय

  • तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी मदत देणार

*महाराष्ट्रात नवीन उद्योग यावेत यासाठी सरकार प्रयत्नशील

१६०० बसेस विकत घेणार
एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या बस बदलून नव्या बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

  • तरुणांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
  • शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ९०३५ कोटी जमा करण्यात आले आहे.

*२ लाखांवरील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देणार

  • २०१८-१९ मधील नियमित कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देणार

*दरवर्षी १ लाख नवीन सौरपंप बसविणार, त्यासाठी १० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे

*मृदासंवर्धनासाठी २८०० कोटींचा निधी देणार

  • शेतीसाठी दिवसाही वीज देणार

*साकोलीत नवीन कृषी महाविद्यालय उभारणार १२०० कोटींचा निधी

  • नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्राला

*नागरी भागांच्या विकासासाठी नवीन योजना

  • महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत सेवांमध्ये वाढ, नव्याने १५२ उपचारांचा समावेश

*जिल्हा क्रीडासाठी ८ कोटींवरून २५ कोटींची वाढ

  • राज्यातील सर्व शाळा आदर्श निर्माण करण्याचे मानस

*बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार

  • पुण्यात ऑलम्पिक भवन बांधणार