अल्पवयीन मुलीवर पित्याने केला अत्याचार

0

नाशिकमधील घटना ; घरसोडून तरुणीने गाठले जळगाव

भुसावळ : जन्मदात्या पित्यानेच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची व माण्ुसकीला काळीमा फासल्याची घटना नाशिक शहरातील सिन्नरफाटा परिसरात घडली. महिनाभर पित्याचा अत्याचार सहन करुन कशीबशी या तरुणीने आपली सुटका करुन रेल्वेने ९ जून रोजी रात्री जळगाव गाठले. लोहमार्ग पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर आरोपी पित्याविरुध्द भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सिन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.  पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील सिन्नरफाटा भागातील विष्णूनगरातील १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिचा पिता व संशयीत आरोपी विक्रम बाबुराव गवळी (वय ४०) याने ७ मे पासून राहत्या घरीच वारंवार अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून पिडीत तरुणीने ९ जून रोजी सायंकाळी एका मैत्रिणीसोबत पळ काढला. डाऊन विदर्भ एक्सप्रेसने ही पिडीता रात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर उतरली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना आपबीती सांगितली. या तरुणीला भुसावळात आणून तीची तक्रार नोंदविण्यात आली. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी तरुणीचा जबाब नोंदवला. तसेच जळगाव जिल्हा रुग्णालयात तिची वैद्यकिय तपासणी करुन उपचार सुरु आहेत. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

अल्पवयीन मुलीवर पित्याने केला अत्याचार 1