अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूचा होणार उलगडा?

0

हत्या की आत्महत्या यावरुन तपासाला मिळणार गती

जळगाव: कांचननगरातील कोमल हिरामण सोनवणे (वय 15) या दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा सोमवारी मृतदेह आढळून आला होता. कोमल बेपत्ता होवुन सात दिवस आणि मृतदेह मिळून आल्यानंतर पाच दिवस लोटले आहेत. मयत तरुणीने आत्महत्त्या केली, तिला धावत्या रेल्वेतून फेकुन दिले किंवा मारुन आणुन या ठिकाणी टाकण्यात आले अशा विवीध शक्यता असतांना कुठलाच पुरावा पाच दिवसात पोलिस मिळवु शकलेले नाही. मयत मुलीचे आई-वडीलांसह शेजारी परिचीतांचे जाब-जबाब पोलिसांनी नोंदवले त्यात फारशी माहिती उलब्ध होत नसल्याने तपासाला दिशा अद्याप मिळाली नाही. याप्रकरणी शुक्रवारी शनिपेठ ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेतली. भेटीचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र वर्तविण्यात येत असलेल्या सर्व शक्यतांसह तसेच याप्रकरणी आरोपी ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

कोमल मृत्यू प्रकरणाचा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आढावा घेतला आहे. त्यानुसार पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी शुक्रवारी भेट घेतली. यात नेमका तपास कुठपर्यंत पोचला याच्या माहितीवरुन निश्चीत दिशा ठरण्याची शक्यता आहे. कोमलच्या शवविच्छेदनाचा वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पोलिस नेमके पाऊल उचलणार असल्याने एक दोन दिवसात या प्रकरणाचा उलगडा होवुन नेमके कारण समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

मृत्यूचे नेमके कारण येणार का समोर?

कोमल बेपत्ता झाली त्याच्या अगोदर दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजचे संकलन करण्यात पोलिस जुंपले, काही ठिकाणचे फुटेज संकलीत करुनही पोलिसांच्या हाती फारसे काही लागु शकले नाही. इतरही ठिकाणचे फुटेज पोलिस संकलीत करीत असून मृतदेह सापडलेले घटनास्थळ मयत तरुणीच्या घरा पासून जवळ आहे. या परिसरात सिसीटीव्हीच उपलब्ध नाही. मात्र, दोन दिवस अगोदर कोमल महाविद्यालयात गेल्याचे व आल्याचे फुटेज पोलिस शोधत आहेत. त्या सोबतच मोबाईल डिसीआर, कॉल डिटेल्स्ची माहिती संकलीत करुन त्याद्वारे तपासाला दिशा देण्यात येत आहे.