अवघड शस्त्रक्रिया करुन महिलेला दिले जीवनदान

0

स्थायीकडून वायसीएम डॉक्टरांचा सन्मान

पिंपरी ः महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका 26 वर्षीय महिलेवर अवघड शस्त्रक्रिया करुन जीवनदान दिल्याबद्दल सर्जन विभागाच्या डॉक्टरांचा स्थायी समितीने बुधवारी सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयात पोटात दुखू लागल्याने एक महिला दाखल झाली. तळवडे येथील त्या 26 वर्षीय महिलेच्या पोटातून साडेतीन किलोचा डेसमॉईड ट्युमर अवघड शस्रक्रिया करून यशस्वीरित्या काढण्यात यश आले. त्या डॉक्टरांनी महिलेचा जीवही वाचविला आहे. त्याबद्दल अधिष्टाता डॉ.संजय वाबळे, सर्जन डॉ. संजय पाडाळे, सर्जन डॉ. कांचन वायकोळे यांचा स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राजेंद्र गावडे, संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते.