Saturday , February 23 2019
Breaking News

अवैध विक्रीसाठी जाणारी चार हजाराची देशी दारू फैजपुर पोलिसांकडून जप्त

फैजपूर- मधुकर सहकारी साखर कारखाना परीसरात विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार हजार रुपये किंमतीचे दोन खोके जप्त करण्यात आले आहे. याकूब सरदार तडवी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी पोलिसांनी कारखाना परीसरात केली. कारखाना परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ व हवालदार इकबाल सय्यद यांनी विक्रीसाठी देशी दारूचे खोके घेऊन जाताना याकूब तडवी याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून चार हजार 108 रुपये किमतीचे दोन देशी दारूचे खोके जप्त केले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ  जळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!