अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारचा अपघात; सात जण ठार !

0

मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी 19 रोजी पहाटे भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच ठार झाले आहे. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स जम्मूहून मृतदेह घेऊन पाटण्याच्या दिशेने जात होती. यावेळेस यमुना एक्स्प्रेस-वेवर बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स दुभाजकावर आदळली आणि उलटली. याचवेळेस आग्र्याहून दिल्लीकडे जाणारी कारने अ‍ॅम्ब्युलन्सला टक्कर दिली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य करण्यास सुरुवात केली. अपघातग्रस्त वाहनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले.