आंतर शालेय बालनाट्य स्पर्धेचे 12 फेब्रुवारी रोजी आयोजन

0

चिंचवड ः कै. राजा गोसावी यांच्या स्मरणार्थ या आंतर शालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. पिंपरी चिंचवड कलारंग यांनी आयोजित केलेली बालनाट्य स्पर्धा येत्या 12 फेब्रुवारी रोजी पिंपरी येथे पार पडणार आहे. आचार्य अत्रे प्रेक्षागृह, पिंपरी येथे बुधवारी (दि. 12 ) सकाळी 9.00 व या स्पर्धेला सुरवात होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे अर्ज नाट्यपरिषद प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उपलब्ध आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक 8 फेब्रुवारी 2020 सं. 7 वा पर्यंत राहील. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन आपण दरवर्षी करत असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.