आक्षेपार्ह पोस्ट : भुसावळातील रेल्वे गेटमनसह दोघांना अटक

0

भुसावळ : भुसावळातील रेल्वेच्या गेटमनसह अन्य एकास सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. दोघां आरोपींना शुक्रवारी शहर पोलिसांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रेल्वे कर्मचार्‍यासह दोघांना अटक
भुसावळातील जयहिंद ग्रुप, भुसावळ 2 या सोशल मिडीया ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा संदेश 4 रोजी सायंकाळी चार वाजून नऊ मिनिटांनी आरोपी सुरेश लक्ष्मण विसपुते (गजानन महाराज नगर, प्लॉट नंबर आठ, भुसावळ) यांनी टाकला होता. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुरनं.156/2020, भादंवि 505/2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली. दुसर्‍या गुन्ह्यात रेल्वे कर्मचार्‍यांच्या एसएसईपीवेएमएलबीएसएल नावाच्या ग्रुपवर 5 रोजी दुपारी 2.20 वाजता रेल्वे गेटमन रमेश पांडुरंग इंगळे (54, आराधना कॉलनीजवळ, खळवाडी, भुसावळ) यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यांच्याविरूद्धही गुरनं.157/2020 नुसान गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा आरोपींना शुक्रवारी शहर पोलिसांनी अटक करीत न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व नंतर दोघा आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद, एएसआय संजय कंखरे करीत आहेत.