BREAKING: आजच रात्री ९ वाजता शिवराजसिंह चौहान यांचा शपथविधी

0

भोपाळ: गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेले मध्य प्रदेशातील राजकीय सत्ता नाट्य सर्वांना परिचित आहे. कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ २२ आमदारांनीही राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येऊन कोसळले. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान यांचा शपथविधी आज रात्री ९ वाजता शपथविधी होणार आहे. राजभवनात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देणार आहेत. भाजपच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.