आज दाखल झालेल्या १९ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 19 व्यक्तीना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते.
या सर्वांचे स्वॅपचे नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी कळविले आहे.