आज संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार !

0

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले आहे. मात्र अद्याप सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरु आहे. युतीत कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन शिवसेनेनेची भूमिका मांडणार आहोत आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशात शिवसेनेने राज्यपालांची भेट घेण्याचे ठरवून राजकारणात दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

राज्यपालांशी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना दबावतंत्राचा वापर करताना दिसते आहे. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले आहेत. आता पुढे काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले असताना संजय राऊत यांनी मात्र राज्यपालांची भेट घेण्याचं ठरवलं आहे. संध्याकाळी पाच वाजता ही भेट घेतली जाणार आहे.