आज संध्याकाळपर्यंत छत्रपती शिवाजी विमानतळाच्या नावाला ‘महाराज’ शब्द जोडण्याचे आश्वासन

0 2

मुंबई – अंधेरी (पूर्व) सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या ८०० कार्यकर्त्यांनी आज बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिले आहे. आमदार व विभागप्रमुख अॅड.अनिल परब यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

१९९० पासून वॉचडॉग फाऊंडेशनचे अॅड.ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी महाराज या नावासाठी सातत्याने लढा दिला होता.