आठ वर्षांपासून पसार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गेल्या आठ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. चुनीलाल सोबरसिंग चितोडीया (46, रा.भगवान नगर, अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध गुरनं.180/2011 अन्वये शासकीय कामकाजात अडथळा, विनयभंग व दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देता होता. आरोपी जालना जिल्ह्यातील अंबड येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नाईक नंदलाल परदेशी, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.