आठ वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचार व हत्येप्रकरणी धुळ्यात मूकमोर्चा

0

धुळे : जळगाव येथील मेहतर समाजाच्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्या निर्षेधात धुळे शहरात वाल्मीक मेहतर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातवर मूक र्मोचा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरूष सहभागी झाले होते.

बत्तीस कॉटर येथून मोर्चाला सुरवात होऊन सतोषी माता चौक, जेलरोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ,तरुणीचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना चर्चा करून निवेदन सादर केले. १२ जून रोजी जळगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करून निर्दयपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी सी. बी. आय.चौकशी करून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून अत्याचार करणाऱ्या नराधमांला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. यावेळी लाखन भिका चागरे, वाल्मीक आणा दामोदर, काशिनाथ लोहार, विजय पवार, एकनाथ जाधव यासह महिला व पुरुष सहभागी झाले होते.