आणखी एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून धर्मांतर; तिसरी घटना !

0 1

नवी दिल्ली : पाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला असतांनाच आणखी एका हिंदू मुलीच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे. सिंध सूचना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दिसणाऱ्या एका बातमीची दखल अल्पसंख्यांक प्रकरण मंत्री हरिराम किशोरी लाल यांनी घेतली आहे. मेघवार समाजाशी निगडीत ही अल्पवयीन मुलगी बादिन जिल्ह्यातील तांदो बाघो या ठिकाणची रहिवासी आहे.

पीडितेच्या वडिलांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बादिनच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षक (एसएसपी) सरदार हसन नियाजी यांच्याशी संपर्क साधलाय. या मुलीचे अपहरण नेमके कधी झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. किशोरी लाल यांनी अधिकाऱ्यांना अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तसंच मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.