आतंकवाद मिटविण्यासाठी सदैव भारतासोबत: ट्रम्प यांची ग्वाही

1

अहमदाबाद: संरक्षण क्षेत्रात अमेरिका भारताला सहकार्य करण्यासाठी तयार आहे. भारतीय सैन्यदलासोबत काम करण्यास आम्हाला आवडेल. भारतीय सैन्यदलासोबत संयुक्त सराव करण्यास आमची तयारी असल्याचेही भारताला सर्वाधिक त्रास दहशतवादी कारवाईमुळे होत आहे. आम्ही आतंकवाद रोखण्यासाठी भारतासोबत आहोत. आतंकवाद मिटविण्यासाठी सदैव भारतासोबत राहणार असल्याची ग्वाही ट्रम्प यांनी दिली.

पाकिस्तानसोबत आमचे चांगले संबंध असून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करू असेही ट्रम्प यांनी सांगितले.

अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटनानंतर ट्रम्प यांनी जोरदार भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सच्चे मित्र आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी भाषणाची सुरुवात केली. भारतीय नागरिकांनी केलेल्या सत्काराने मी भारावलो असून हा समस्त अमेरिकन नागरिकांचा सन्मान आहे असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.