Saturday , February 23 2019
Breaking News

आत्महत्येला नवे वळण

कल्याण । कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला (56) यांनी तीन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. मृत झोजवाला यांना सिडकोचे चेअरमनपद देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 7 कोटी रुपयांना गंडा घातला होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

संजय घोष व प्रवीण सिंग अशी सिडकोच्या चेअरमनपदाचे आमिष दाखवून 7 कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या भामट्यांची नावे आहे. आसिफ झोजवाला हे कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. त्यांनी 5 मार्च 2018 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, संजय घोष व प्रवीण सिंग यांनी झोजवाला यांना सिडकोचे चेअरमनपद देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सात कोटी उकळले होते. सिडकोचे चेअरमनपद न मिळाल्याने झोजवाला यांनी संजय घोष व प्रवीण सिंग यांना जाब विचारला असता या दोघांनी त्यांना मानसिक त्रास दिला. याच त्रासातून झोजवाला यांनी आत्महत्या केल्याचा आरोप झोजवाला यांच्या पत्नीने केला आहे तसेच याप्रकरणी पत्नीने मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. पोलिसांनी या दोन्ही भामट्यांविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

पाकड्यांच्या घरात घुसून शहिदांच्या बलिदानाचा बदला घेवू

संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे ; प्रत्येकाच्या मनात रक्षाताई भुसावळ- जम्मू कश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात झालेल्या प्रत्येक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!