आदर्श राजकारण: विजयी झाल्यानंतर रोहित पवार राम शिंदेंच्या घरी !

0

कर्जत: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले आहे. त्यांनी भाजपचे विद्यमान मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विजयी झाल्यानंतर रोहित पवार यांनी राजकारणात नवीन आदर्श निर्माण केला आहे. पराभूत उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतला आहे. यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना भाजप नेत्याकडून विकासासाठी समर्थन देण्याचे आवाहन केले.

रोहित पवार यांच्या या कृत्याने राजकारणात नवा आदर्श निर्माण होणार आहे, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.