आदिवासी युवतीवर अत्याचार, नंदुरबारच्या पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

0

यावल- तालुक्यातील वाघझीरा येथील 25 वर्षीय आदिवासी युवतीस युवतीच्या लग्नापूर्वी व लग्नांनतर प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून सुमारे अडीच वर्ष तिच्यावर अत्याचार करून युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील वाघझिरा येथील मूळ रहिवासी तथा नंदुरबार पोलिस मुख्यालय पोलिस कॉस्टेबल म्हणून नोकरीस असलेल्या इरफान अकबर तडवी या पोलिसांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लग्नाच्या आमिषाने अत्याचार
तालुक्यातील वाघझिरा येथील 25 वर्षीय युवतीने येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघझिरा आश्रम शाळेत इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेत असतांना गावातीलच इरफान अकबर तडवी व मी वर्गमीत्र होता.. त्यानंतरच्या काळात किनगाव येथे डी.एड करीत असतांना माझा मोबाईल नंबर घेवून त्याने प्रेमाचे व लग्नाचे आमीष दाखववत अत्याचार केला. एप्रिल 2017 मध्ये पीडीत ही पोलिस भरतीसाठी नंदुरबार येथे गेली असता त्यावेळी इरफान तडवी हा गावापासुन तिच्या सोबत बसमध्ये होता व नंदुरबार बसस्थानकावर उतरल्यानंतर त्याने प्रेमाचे आमिष दाखवत गौरव पॅलेस या लॉजवर नेत अत्याचार केला. त्यानंतर 1 जुन रोजी जळगाव येथे पीडीत तरुणीची डी.एड.ची परीक्षा असतांना 10 दिवस त्याने वारंवार जळगाव येथील स्टेशन रोडवरील देव हॉटेल येथे तसेच जानेवारी 19 पर्यंत यावल तालुक्यातील मोर धरण परीसर, आडगाव व हिंगोणा परिसरात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यानच्या काळात तरुणी गर्भवती राहिली व पिडीताचे इतर दुसर्‍या ठिकाणी लग्न ठरून विवाह झाला मात्र ती गर्भवती असल्याने विवाहानंतर लगेच माहेरी आली व नंतर सासरी न जाता नंदुरबारला इरफान तडवीकडे गेली तेव्हा त्याने पीडीतेस जळगावच्या का रुग्णालयात नेवुन गर्भपात करवून घेतल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.

फसवणूक झाल्याने दाखल केला गुन्हा
पीडीत तरुणीला तिचे झालेले लग्न मोडायला लावले व तिला पुन्हा विश्वासात घेवून गर्भपात करण्यात आला व त्यानंतरही लग्न करण्यात आली नाही शिवाय आरोपी स्वत:करीता लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचे पीडीतेच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तिने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.