‘आप’साठी गड आला पण सिंह गेल्याची परिस्थिती; मनिष सिसोदिया पराभवाच्या छायेत !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजप आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत झाली. आपला ५८ तर भाजपला १२ जागांवर आघाडी मिळालेली आहे. अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र केजरीवाल यांचा मुख्य साथीदार उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे पराभवाच्या छायेत आहे. मनिष सिसोदिया हे अडीच हजाराने पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव झाल्यास आम आदमी पक्षासाठी ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच काहीशी परिस्थिती होणार आहे. मनिष सिसोदिया हे शिक्षण मंत्री होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामावरून ते जगभर प्रसिद्ध आहेत.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन हे देखील पिछाडीवर आहेत. मनिष सिसोदिया आणि सतेंद्र जैन हे दोन महत्त्वाचे साथीदार मानले जातात. मात्र हे दोन्ही नेते पराभवाच्या छायेत असल्याने केजरीवाल यांच्यासाठी हे धक्कादायक आहे.