आमचे ठरले असल्याचे सांगत मुख्यमंत्री पदाबाबत बोलण्यास फडणविसांनी टाळले !

0

मुंबई: महाराष्ट्रात आमच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक आहे. कारण मागील निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या, या निवडणुकीत १५० आणि मित्रपक्ष १४ असे १६४ जागा लढविल्या. त्यापैकी १०१ जागा जिंकल्या आहेत. याचा स्ट्राईक रेट बघितले असता तो मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे असे सांगत हा निकाल आमच्यासाठी समाधानकारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत त्यांनी आमच्यात व शिवसेनेत मुख्यमंत्री कोण होणार हे ठरले असल्याचे सांगत बोलण्यास टाळले.

दोन निकाल धक्कादायक

राज्यातील दोन जागांवरील निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. साताऱ्यातील उदयराजे आणि परळीमधील पंकजा मुंडे यांचा पराभव आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

आज फक्त विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. अधिक विश्लेषण करण्याची आज गरज नसल्याचे सांगत, सत्ता स्थापन आणि मुख्यमंत्री पदावर बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी टाळले.