अमळनेरला सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणी मोहीम

0

अमळनेर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमळनेर शहरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची व तज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन विशेष तपासणी मोहिमेची संकल्पना मांडल्यानंतर शुक्रवारपासून सानेगुरुजी शाळेत तज्ञ डॉक्टरांकडून दररोज १० ते १ या काळात तपासणी सुरू करण्यात आली आहे. एक बालकांचा व एक प्रौढांचा कक्ष तयार करण्यात आला असून बालरोग तज्ञ डॉ नितीन पाटील, डॉ जी एम पाटील, डॉ अविनाश जोशी, डॉ किरण बडगुजर, डॉ संदीप जोशी, डॉ राजेंद्र शेलकर, डॉ प्रशांत शिंदे आदींनी रुग्णांची तपासणी केली. त्यामुळे इतरत्र संसर्ग न वाढता लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, विक्रांत पाटील, एल टी पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, डॉ विलास महाजन, पालिका कर्मचारी महेश जोशी, भालचंद जगताप, कीर्ती गाजरे ,मीरा देवरे हजर होते.
बाहेरून आलेल्या व स्थानिक रुग्णांची येथे तपासणी मोफत करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व खाजगी व खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टरांनी सर्दी ताप खोकल्याचे सर्व रुग्ण याठिकाणी पाठवावेत जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल. संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.