आमदार जगतापांच्या हस्ते रहाटणीत बोधीवृक्ष रोपण

0

चिंचवड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त रहाटणीतील शास्त्रीनगर येथे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. रहाटणी येथील आनंद बुद्ध विहार व नगरसेवक बाबा त्रिभुवन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, नगरसेवक बाबा त्रिभुवन, राजेंद्र गावडे, चंद्रकांत नखाते, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गोपाळ माळेकर, अनिल नखाते, आनंद मित्र मंडळाचे अध्यक्ष महादेव कांबळे, पोपट कदम, महेंद्र गायकवाड, अंजना कांबळे आदी उपस्थित होते.