आम्हाला फाशी दिल्यानंतर बलात्कारच्या घटना थांबणार नाही !

0

नवी दिल्लीः दिल्लीतील निर्भया बलात्कार आरोपींना उद्या सकाळी फासावर लटकवण्यात येणार आहे. तत्पूर्वी आरोपी विनयने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, आम्हाला फासावर लटकवल्याने देशात बलात्कार थांबत असतील तर बेशक फाशी द्या. पण हे बलात्कार थांबणार नाहीत असे सांगितले. दोषींच्या फाशीला अवघा एक दिवस उरला आहे. पण दोषी मुकेशला सोडलं तर इतर तिघांना फाशी दिली जाईल असं अजूनही वाटत नाहीए, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

तुरुंग प्रशासनाने जवळपास १० कर्मचाऱ्यांना फाशी देण्यात येणाऱ्या विभागात तैनात करण्यात आले आहे. २० मार्चपर्यंत याच ठिकाणी तैनात असतील. बुधवारी फाशीचा सराव केला गेला. उद्या सकाळी म्हणजे २० मार्चला सकाळी ५.३० वाजता चारही दोषींना फासावर लटकवलं जाईल. यासाठी त्यांना पहाटे तीन वाजता उठवण्यात येईल. त्यांना आंघोळ आणि नाश्त्यासाठी विचारलं जाईल. त्यांना वाटलं तर आंघोळ करू शकता अन्यथा नाही म्हणू शकतात.

फाशीच्या दोन चौथऱ्यांवर चार फास लावण्यात आले आहेत. तिथे चौघा दोषींना फाशी दिली जाईल. यापैकी एका चौथऱ्याचा चाप जल्लाद पवन ओढेल तर दुसऱ्या चौथऱ्याचा चाप तुरुंग प्रशासनाचे कर्मचारी ओढतील. यासाठी तुरुंग क्रमांक ३ चे अधीक्षक ग्रीन सिग्नल देतील. दरम्यान, हे दोषी गुरुवारी पुन्हा पतियाळा हाउस कोर्ट आणि कलम ३२नुसार सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. गुरुवारी म्हणजे आज दिवसभर कोर्टात सुनावणी होऊ शकते. निर्णय होण्यास रात्रही होऊ शकते. आता या दोषींची फाशी टळणं अवघड असल्याच्जे एका अधिकाऱ्याने सांगितले.