आम्ही अयोध्येत बाबरी मशीद बांधू; अबू आझमीच्या मुलाचे वक्तव्य !

0

मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार आहे. दरम्यान यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीच्या मुलाने वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर, आम्ही सुद्धा मशीद बांधण्यासाठी अयोध्येला जाऊ असे फरहान आझमी यांनी म्हटले आहे. “उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार असतील तर, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील, आम्ही बाबरी मशीद बांधू” असे वक्तव्य फरहान आझमी यांनी केले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाच्यावेळी फरहान आझमी यांनी हे वक्तव्य केले. सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थतता असल्याचे फरहान आझमी म्हणाले.