• Login
ePaper
Janshakti Newspaper
Monday, January 18, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून

30 Jul, 2020
in ठळक बातम्या, राज्य
0
आजपासून अकरावी प्रवेश अर्जास सुरुवात
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात ttps://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत असेहीे नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात.

यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत असे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

ADVERTISEMENT

प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खाजगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक– २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेश क्षमता.

आयटीआय प्रवेशासंबंधीत नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपध्दती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल (Skill Gap Study Report), व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपध्दती इत्यादींबाबतची माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपुर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

हार्दिक पांड्या बनला ‘बापमाणूस’; घरी नव्या सदस्याचे आगमन

Next Post

कोरोनावर मात करण्याचा ‘हाच’एकमेव मार्ग; आरोग्य मंत्रालयाने सांगितला पर्याय

Related Posts

विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव
ठळक बातम्या

विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

18 Jan, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी
जळगाव

एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

18 Jan, 2021
Next Post
कोरोनावर मात करण्याचा ‘हाच’एकमेव मार्ग; आरोग्य मंत्रालयाने सांगितला पर्याय

कोरोनावर मात करण्याचा 'हाच'एकमेव मार्ग; आरोग्य मंत्रालयाने सांगितला पर्याय

प्रतीक्षा संपली, लाईव्ह पहा हिंदू राष्ट्र अधिवेशन

प्रतीक्षा संपली, लाईव्ह पहा हिंदू राष्ट्र अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group