आरोग्य कर्मचाऱ्यांची मास्क, ग्लोज नसतांना सेवा

0

नवापूर : तालुक्यात आरोग्य सेवकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवापूर तालुक्यात 45+45 च्या तीन  टीम तयार केलेल्या असून त्यात जवळ जवळ 400 अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक नर्सेस असे एकूण हजारो च्या संख्ये कर्मचारी आपली सेवा देण्याचे काम करत आहेत.

संपूर्ण जगाला हादरून सोडलेल्या ह्या कोरोना वायरसचा सामना करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या निगराणीत सम्पूर्ण तालुक्यात घरोघरी होम कोरोंटाईन झालेल्या लोकांवर निगराणी ठेवणे परराज्यातून आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी करणे नियमित ही कामे ही सम्पूर्ण टीम करत आहे 

अयोग्य सेवा देणाऱ्या ह्या सेवकांना सुरक्षे साठी लागणारे साहित्य प्रशासना कडून वेळोवेळी पुरवले पाहिजे परंतु प्रशासना कडून साहित्य दिले जात नसल्याचे निदर्शनात आले आहे .   यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या ह्या कर्मचारीचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे