आरोपी पळाला, कारागृह कर्मचारी जखमी

0

जळगाव – कारागृह कर्मचार्‍यांच्या हाताला हिसका देऊन एका आरोपीने पलायन केल्याची घटना गुरुवारी, सायंकाळी जळगाव जिल्हा कारागृहाच्या बाहेर घडली. या आरोपीला ताब्यात घेण्यात कारागृह कर्मचार्‍यांना यश आले असले, तरी त्यासाठी झालेल्या झटापटीत कारागृह कर्मचारी प्रकाश कोकणी हे जखमी झाले आहेत.
राकेश वसंत चव्हाण हा सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात जळगाव जिल्हा कारागृहात आहे. त्याच्यावरील खटल्याचे कामकाज गुरुवारी, अमळनेर कोर्टात झाले. त्यानंतर त्याला परत जळगावला आणण्यात आले. परंतु, कारागृहाच्या बाहेरच त्याने कर्मचार्‍यांच्या हाताला हिसका देत पळ काढला. नंतर या आरोपीला कारागृहाच्या मागील बाजूस पकडण्यात आले.