Sunday , March 18 2018

आलेगावमधील शेतात जादूटोणा

दौंड । आलेगाव येथे जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहा जणांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली. विठ्ठल ज्ञानदेव काळे, सुभाष मारुती काळे (दोघेही रा. आलेगाव, ता. दौंड) व अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. देऊळगांव राजे हद्दीतील प्रदीप आत्माराम काळे यांच्या गट नं. 360 मधील पडीक जमिनीत गेल्या एक ते दीड वर्षापासून दोन तीन महिन्यांनंतर उतारा टाकण्याचे प्रकार होत होते.

शेतमालकाचे वाटोळे होऊ दे
9 मार्च रोजी फिर्यादी प्रदीप आत्माराम काळे व त्यांचा भाऊ दीपक आत्माराम काळे (रा. आलेगाव, ता. दौंड) दोघे रात्री 10.30 वाजता शेतात पाणी देण्यासाठी गेले असता, त्यांना बॅटरीचा उजेड दिसला. काही अंतरावर थांबून पाहिले असता त्या ठिकाणी सहाजण विधी करत असल्याचे आढळून आले. सर्व प्रकार पाहिल्यावर फिर्यादी व त्यांचा भाऊ उसातच लपून बसले. शेतमालकाचे वाटोळे होऊ दे, असे म्हणत आरोपींनी शेतजमिनीत दोन कोंबड्या ओवाळून सोडल्या व टाचणी टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळदी-कुंकू इत्यादी वस्तू टाकल्या. जर आमचे आठ दिवसांत काम झाले तर, तुझी भूक भागवण्यासाठी नरबळी देऊ, असेही ते मोठ्याने म्हणाले. 15 ते 20 मिनिटे हा प्रकार चालू होता. त्यानंतर सर्व आरोपी काळे वस्तीच्या दिशेने गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार तपास करत आहेत.

हे देखील वाचा

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *