आसोदा-भादली रेल्वे फाटक 20 व 21 रोजी बंद राहणार

0

भुसावळ- भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव जवळील आसोदा-भादली दरम्यान असलेला रेल्वे फाटक क्रमांक 149 हे 20 रोजी पहाटे ते 21 फेब्रुवारीच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. भादली-जळगाव दरम्यान तांत्रिक कामे करण्यासाठी हे फाटक दोन दिवस बंद राहणार असून त्यामुळे या फाटकावरून सुरू राहणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनधारकांनी याची नोंद घेऊन आपल्या सोयीनुसार पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.