इंदापूर, बारामतीतील शेतकरी अडचणीत

0

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांची टीका

इंदापूर : इंदापूर, बारामती हे तालुके प्रगतशील असल्याचा मोठा गवगवा केला जात असला तरी या तालुक्याच्या काही भागात फिरलो असता वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे समोर येते. शहर आणि काही गावे सुधारली असली तरी या तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर मोठ्या अडचणी असल्याचे लक्षात येते, असे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.

वझरे येथे माधवराव भंडारी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून ग्रामीण भागातील विकासकामांचा वेग वाढला आहे. येथील ग्रामीण भागात तर अद्यापही काम करण्यास मोठा वाव आहे.

शिवनेरी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा शुभारंभ

पिंपरी बुद्रुक येथे शिवनेरी प्रतिष्ठान संस्थेच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभही भंडारी यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष युवराज बोडके पाटील, मारुती वनवे, सदानंद शिरसाळे, रमेश खरतोडे, बाबासाहेब चौरे उपस्थित होते. गावचे सुपुत्र शहीद जवान वजीर रास्ते यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी संदीप सुतार पत्रकार, शौकत तांबोळी यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवराज बोडके पाटील यांनी केले. सूत्रसंचालन युवराज बोडके यांनी केले.