इंदिरा गांधी यांना युद्धाचे श्रेय दिले जाते, मग मोदींना का नाही: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

0 1

नवी दिल्ली: १९७१ साली झालेल्या युद्धाच्या विजयाचे श्रेय इंदिरा गांधी यांना दिले जाते, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बालाकोट एयरस्ट्राईक श्रेय का दिले जाऊ नये? असा प्रश्न केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाकयुध्द पेटण्याची चिन्हे दिसत आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एयर स्ट्राईकच्या श्रेयावरून, मोदी हे राजकीय फायदा घेत असल्याचा आरोप कॉंग्रेस आणि विरोधी पक्षाने आपल्या प्रचार सभेत केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय मंत्र्यांनी हे विधान केले आहे.

स्वातंत्र्यानंतर जेव्हा-जेव्हा भारताचे शेजारी राष्ट्रासोबत युध्द झाले, त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबध देशातील सत्तेवर असलेल्या नेत्यांसोबत जोडला गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १९७१ च्या युद्धाचे श्रेय, बांगलादेश निर्मितीचे श्रेय, १९६२ च्या चीन सोबत झालेल्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता त्या युद्धात झालेल्या पराभवाला त्यावेळचे पंतप्रधान पंडीत नेहरू यांना जबाबदार धरले जाते असेही ते म्हणाले.

एयर स्ट्राईक केल्याबद्दल देशातील जनता मोदींचे कौतुक करत असुन, होत असलेले कौतुक कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कसे काय थांबवतील असा प्रश्न पण त्यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तानच्या युद्धात भारतीय जनसंघने इंदिरा सरकारला बिनशर्त पाठींबा दिला होता, मात्र सत्तेसाठी भुकेला असलेला कॉंग्रेस पक्ष पाकिस्तानला असलेलेली अनुकूल अशी भूमिका घेत असल्याच आरोप त्यांनी लावला.