‘ इंद्रायणी थडी ‘ महाराष्ट्राची संस्कृती जपणारे व्यासपीठ – आमदार महेश लांडगे

0
' इंद्रायणी थडी ' महाराष्ट्राची संस्कृती जपणारे व्यासपीठ - आमदार महेश लांडगे 1

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी इंद्रायणी थडीचे उद्घाटन – पुजा लांडगे

राम मंदिराची प्रतिकृती व रामायणाचा लेझर शो ठरणार मुख्य आकर्षण

भोसरीत शिवांजली सखी मंचच्या वतीने भव्य इंद्रायणी यडीचे आयोजन

पिंपरी – महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी. राज्यातील विविध प्रांतातून आलेल्या महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भोसरी यथे शिवाजली सखी मंचच्या माध्यमातून गुरुवारी ( दि . 30 जानेवारी ) ते रविवारी ( दि . 2 फेब्रुवारी ) पर्यत ‘ इंद्रायणी थडी जत्रा भरविण्यात आली आहे , अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी संयोजिका व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे , माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह या परिसरातील नगरसेवक, आयोजक, संयोजक आदी उपस्थित होते . भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजवा मैदानावर आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भरविलेल्या ‘ इंद्रायणी थडी ‘ चे हे दुसरे वर्ष आहे . गुरुवार ते रविवार पर्यंत चार दिवस खाद्यमहोत्सव , मनोरंजन , प्रबोधन आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यारी ही जत्रा लक्षवेधी ठरणार आहे . जत्रेचे उद्घाटन नामुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थितीत राहणार आहेत. ही जत्रा सर्वांना मोफत प्रवेश आहे अशी माहिती संयोजिका व शिदांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे यांनी दिली .
आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘ महिला सुरक्षा आणि सन्मान ‘ ही ‘ थीम ‘ घेवून आम्ही ‘ इंद्रायणी यडी ‘ जत्रेचे दुसरे वर्ष साजरे करीत आहोत. गावजत्रा मैदानावर 12 एकर जागेवर 800 स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल 2 हजार 173 अर्ज दाखल झाले होते . जागेअभावी फक्त 800 स्टॉल उभारले आहेत. थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा वाडा पुण्यामध्ये ‘ समता भूमी ‘ येथे आहे. त्याची भव्य प्रतिकृती मुख्य प्रवेशव्दारावर उभारली आहे.

त्यावर थोर व्यक्तीच्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. वाड्यात प्रवेश करताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा लक्षवेधून घेत आहे. पुढे अयोध्येतील नियोजित राम मंदिराची प्रतिकृती , ‘ रामायण ‘ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो, समतेची शिकवण देणारे महात्मा जोतीराव फुले आणि महिलांसाठी पहिला शाळा सुरु करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची साक्ष देणारा ‘महात्मा फुले वाडा’ ची प्रतिकृती , ग्रामीण संस्कृतीची ओळख पटवून देणारी ग्रामसंस्कृती ‘, बाल जत्रा , गड – किल्ले छायाचित्र प्रदर्शन , शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, महिलांसाठी स्व : संरक्षणाचे धडे , प्रबोधनात्मक कीर्तन, अभंग बँड , पारंपरिक नृत्य स्पर्धा , नृत्य स्पर्धा, मंगळगौरी खेळ आणि उखाणे स्पर्धा अशा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी जत्रेत येणाऱ्या नागरिकांना अनुभवता येणार आहे. गुरुवारी ( दि . 30 ) सायंकाळी 5 वाजता चला हवा येऊ द्या हा मनोरंजनाचा कार्यक्रम, शुक्रवारी ( दि. 31 ) सायंकाळी 5 वाजता खेळ बाहुल्यांचा ( पपेट शो ), शनिवारी ( दि .1 फेब्रुवारी ) मैजिक शो, रविवारी ( दि . 2 ) सायंकाळी 5 वाजता अशी बाल जत्रा, मनोरंजन, कला, सांस्कृतिक, गादरान खाद्यपदार्थ महोत्सव, सामाजिक उपक्रम अशा भरगच्च विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असणारी या वर्षीची इंद्रायणी थडी जत्रा हि महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ठरेल.

पुजा लांडगे यांचे नागरिकांना आवाहन …
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत ‘ इंद्रायणी थडी जत्रा मैलाचा दगड ठरणार आहे . अधिकाधिक नागरिकांनी जत्रेला आवर्जुन यावे. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात. तसेच महिलांनी बनविलेल्या गावरान चविष्ट भोजनाचा आस्वाद घ्यावा. आपल्या सर्वांच्या सहभागाने महिलांना प्रोत्साहन मिळेल. सर्वांना मोफत प्रवेश तसेच जत्रेतील कोणत्याही स्टॉलधारकाला शुल्क आकारलेले नाही . पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या जत्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे यांनी केले आहे.