इफ्फीत मराठी सिनेमांचा बोलबाला

0

मुंबई: इफ्फी मध्ये यंदा ६ मराठी सिनेमे दाखवले जाणार आहे. गोव्यात इफ्फी चित्रपट लवकरच सुरु होणार असून देश-विदेशातील सिनेनिर्मात्यांचे लक्ष लागून राहिले आहे. देशभरातील कलाकारांबरोबरच परदेशातील फिल्ममेकर्सना ज्या भारतीय सिनेमहोत्सवाची आतुरता असते तो इफ्फी (दि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) चित्रपट महोत्सवात यंदा ६ मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

यंदा इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानं मोठ्या संख्येनं सिनेरसिक इथे येतील असा अंदाज आहे. २० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान हा महोत्सव रंगेल. भारतातल्या समकालीन सिनेमांचा आवाका जागतिक पातळीवर समजावा यासाठी महोत्सवातला ‘इंडियन पॅनोरमा’ हा विभाग ओळखला जातो. देशभरातील विविध प्रादेशिक आणि हिंदी सिनेमांतून सर्वोत्कृष्ट सिनेमांचं प्रदर्शन इंडियन पॅनोरमामध्ये होतं. यंदा या विभागात सहा मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

शिवाजी लोटन-पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राइम नंबर १०३|२००’,आदित्य राही-गायत्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’, गणेश शेलार दिग्दर्शित ‘गढूळ हे सहा सिनेमे दाखवण्यात येणार आहे.