इमारतीच्या १०व्या मजल्यावरून पडून २ कामगारांचा मृत्यू

0 1

मुंबई : बांधकाम सुरूअसलेल्या एका इमारतीच्या १०व्या मजल्यावरून पडून २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींना महापालिकेच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही घटना चेंबूरमध्ये घडली.

चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओसमोर मैत्री पार्क बस स्टॉपच्या बाजूला असलेल्या शबरी एंटर प्रयजेस या कमर्शियल बिल्डिंगमध्ये खिडकीचं काम सुरू होतं. हे काम करत असताना ४ कामगार खाली पडले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. अहमद शहादत शेख, (वय- ३२ वर्षे), राजेंद्र बट्टीलाल कोल (वय- ४५ वर्षे) असे मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.