Wednesday , February 20 2019
Breaking News

ईगतपुरी रेल्वे स्थानकावर सिग्नल व पॉवर ब्लॉक ; दोन दिवस गोदावरी एक्स्प्रेस रद्द

आठ गाड्या धावणार उशिराने ; प्रवाशांची होणार गैरसोय

भुसावळ- ईगतपुरी रेल्वे स्थानकावर सिग्नल तसेच पॉवर ब्लॉक व नवीन रीले इलेक्ट्रॉनिक पॅनलच्या कारणास्तव 11 ते 12 ऑक्टोबर रोजी 12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस व 12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे या शिवाय अनेक गाड्या उशिराने सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

आठ गाड्या धावणार उशिराने
12 रोजी सकाळी 10.55 वाजता सुटणारी 11055 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस दुपारी एक वाजता सुटणार आहे तसेच 12542 एलटीटी-गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस सकाळी 11.10 ऐवजी दुपारी 1.45 वाजता सोडण्यात येणार आहे. 82356 मुंबई-पटना ही गाडी मुंबई येथून सकाळी 11 ऐवजी दुपारी दिड वाजता सोडण्यात येईल तसेच 12071 दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दादर येथून दुपारी दोन ऐवजी 2.50 वाजता सुटेल. 11083 एलटीटी-काझीपेट ही गाडी सकाळी 11.30 ऐवजी दुपारी दोन वाजता सुटेल. 15066 पनवेल-गोरखपूर ही गाडी पनवेलहून सायंकाळी 5.50 ऐवजी रात्री नऊ वाजता सुटेल. 11061 एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस ईगतपुरी रेल्वे स्थानकावर दुपारी 2.55 ते दुपारी 4.20 मिनिटांपर्यंत थांबवण्यात येणार आहे शिवाय 11071 एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस ईगतपुरी रेल्वे स्थानकावर दुपारी 3.20 ते दुपारी 4.45 वाजेपर्यंत थांबवण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

शिंदखेडा पंचायत समितीचा लघूसिंचन अभियंता एसीबीच्या जाळ्यात

योजनेच्या लाभासाठी चार हजारांची लाच भोवली ; धुळे एसीबीची कारवाई शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!