Wednesday , February 20 2019
Breaking News

उंदरांनी कुरतडल्याने नवजात बाळाचा मृत्यू

बिहार : उंदरांनी ९ दिवसांच्या नवजात अर्भकाला कुरतडल्याची धक्कादायक घटना बिहारमधील दरभंगा शहरातील डीएमसीच रुग्णालयात घडली आहे. उंदरांनी कुरतडून काढल्यामुळे त्या चिमुकल्या जीवाचा काही वेळातच मृत्यू झाला. संतप्त पालकांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

या अर्भकाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. ऑपरेशन नंतर काही वेळाने जेव्हा ते बाळाला पाहण्यासाठी आले तेव्हा आयसीयूत डॉक्टर, नर्सचा पत्ता नव्हता. काही उंदीर बाळाला कुरतडत होते. हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने नर्स आणि डॉक्टरांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या बाळाचा मृत्यू झाला होता. संतप्त कुटुंबियांनी निष्काळजी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान त्या अर्भकाला आधीच उंदरांनी कुरतडलं असल्यामुळे त्याचे आई-वडिल रुग्णालयात घेऊन आले होते अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

शिंदखेडा पंचायत समितीचा लघूसिंचन अभियंता एसीबीच्या जाळ्यात

योजनेच्या लाभासाठी चार हजारांची लाच भोवली ; धुळे एसीबीची कारवाई शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!